अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर,सह खजिनदार श्री.शरद चव्हाण,स्वीकृत संचालक श्री.रवी गावडे,निर्माते,वितरक श्री.सुरेन्द्र पन्हाळकर,अरुण भोसले ( चोपदार), प्रमुख व्यवस्थापक श्री.रवींद्र बोरगावकर यांनी आज कोल्हापूर येथे सुरू असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणस्थळी भेट दिली व राज्य सरकारने कोरोना संबंधी तयार केलेल्या नियमावलीचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी केली तसेच त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

