Rate this item
(0 votes)

पुणे

पुण्यात पुनीत बालन यांच्या सहाय्याने 250 कलावंतांना (कामगार, तंत्रज्ञ, जूनियर आर्टिस्ट) यांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच त्याशिवाय स्थानिक संचालक यांनी स्वतंत्ररित्या आपआपल्या कॉनटॅक्ट मधून आणखी 120- 125 लोकांना रु. 2000/- प्रमाणे आर्थिक सहाय्य पोहचवले आहे.

तसेच स्थानिक समिति सदस्य श्री. नागनाथ गौसाने, प्रशांत बोगम, व त्यांचा हडपसर मधील मित्रपरिवार, यांनी पुण्यातील हडपसर भागात वेगवेगळ्या दात्यांकडून धान्य व जीवनावश्यक साहित्य घेऊन त्याचे वर्गीकरण करुन, हे साहित्य आपल्या बँकस्टेज आर्टिस्ट, ज्युनियर आर्टिस्ट, तंत्रज्ञ यांना स्वखर्चाने घरपोच पोचवले.

त्याचबरोबर अभिनेता, लेखक नितिन जाधव यांनी लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून गोरगरीब , पोलीस बांधव ,सफाई कर्मचारी , मुके जनावर कुत्र्यालाही रोज चहा नाश्ता , बिस्कीट ,जेवण हि सेवा स्वखर्चावर दिली. आणि हि बाब इतर कलाकारांनीही आचरणात आणावी व आप आपल्या परीनं या कठीण समयी सामाजिक बांधिलकी जपावी हि इच्छा त्यांनी व्यक्त केली.

तसेच विनय जवळगीकर, शोभा कुलकर्णी, काळूराम भोकरे (स्पॉट इंचार्ज) अभिनेता अमित कल्याणकर, राहुल बेलापूरकर, अभिनेता अॅनकर योगेश सुपेकर यांच्या मार्फत अन्नधान्य व आवश्यक किराणा सभासदानपर्यन्त पोचवण्यात आला आहे

Many years after establishment of Maharashtra state Marathi film industry had grown like a tree, but in the absence of dedicated organization. Slowly and gradually Marathi film producers started coming together to produce films for soldiers’ entertainment during tough time of Chinese invasion and Pakistani war.
 

Newsletter

In Theatres