अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सिद्धहस्त *लेखक,निर्माता व वितरक स्व.आण्णासाहेब देऊळगावकर* यांच्या जन्मशताब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त मान्यवरांचे मनोगत व *कलायोगीची कर्तृत्व गाथा* ही त्यांच्या जीवनपटाची ओळख करून देणारी चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. तसेच *माया बाजार* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार- तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कृपया आपण आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
*ठिकाण:- मिनी थिएटर, तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई-२५*
*दि.२०/१२/२०१९*
*वेळ :- दु.४ वा.*
*****************************************
*मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच* *पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,*
*अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ*

