सातारा येथे दि.५/३/२०१७ रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार संजय ठुबे, तसेच संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे,सतीश बिडकर, संचालिका अभिनेत्री वर्षा ऊसगावकर , निकीता मोघे, सह खजिनदार शरद चव्हाण ,संचालक आण्णा देशपांडे तसेच अभिनेते सुशांत शेलार यांची प्रमुख उपस्थिति होती.
यावेळी सातारा शहर, इतर जिल्ह्यातील शेकडो कलाकार, तंत्रज्ञ व चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी सातारा येथील सर्व चित्र कर्मीं, कलाकार व चित्रपट व्यावसायिक यांचा स्नेहमेळावा प्रथमच आयोजिला होता.यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना चित्रपट महामंडळाची यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली। तसेच चित्रपट व्यावसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर आण्णा देशपांडे यांनीही उपस्थित असणाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून महामंडळाचे कार्यालय किती गरजेचे व महत्वपूर्ण असल्याचे सांगितले संचालिका वर्षा ऊसगावकर यांनीही नवीन कलाकारांच्या पाठीशी राहून महामंडळ सर्वोतोपरी प्रयत्न करेल. यावेळी विजय पाटकर,सुशांत शेलार,पिंताबर काळे,सतीश रणदिवे धनाजी यमकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
चित्रपटाच्या इतर कुठल्याही माहिती वा मार्गदर्शनासाठी चित्रपट महामंडळाच्या सातारा येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी केले आहे.
कार्यालयाचा पत्ता: अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, ६६६,शेटे चौक, गुरूवार पेठ,सातारा.





