सध्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांचे खोटी ऑडिशन घेऊन चित्रपटात महत्वाची भूमिका देतो असे आमिष दाखवून पैश्याची अफरातफर तसेच स्त्रियांचे शोषण होत आहे. अश्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पाऊल उचलले असून यासंदर्भात दि.१/७/२०१६ रोजी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले व शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक मा.श्री.प्रविण दीक्षित साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले यावर मा.दीक्षित साहेबांनी महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस यंत्रणा महामंडळाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.