मुंबई : चित्रपटगृहामध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात येतं. आता राष्ट्रगीतापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कार्याचा गौरव करणारी एक चित्रफीत यापुढे दाखवली जाणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके एम.एस.के. ट्रस्टतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना यंदाचा फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी तावडे बोलत होते.
दादासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ही चित्रफीत 30 सेकंदांची असेल. जो चित्रपट आपण पडद्यावर पाहत आहोत, त्या कलेचे पितामह दादासाहेब फाळकेंबाबत जनसामान्यांना माहिती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
NEWS COURTSY : abpmajha