अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर व प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरी येथे नुकतीच भेट दिली यावेळी चित्रनगरीचे अधिकारी श्री.दिलीप भादिगरे यांनी कोल्हापूर चित्रनगरी मध्ये असलेल्या सोयी सुविधा बाबत सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात कोल्हापूर चित्रनगरी साठी लागणाऱ्या सुविधा कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध होतील याबाबत पाठपुरावा आपल्या महामंडळाने करावा असे सांगितले.त्यावर महामंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री सुशांत शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरीसाठी आवश्यक असणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध होण्याकरीता तातडीने प्रयत्न करणेत येईल याकरिता लवकरच माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरेसाहेब आणि सांस्कृतिक मंत्री,सांस्कृतिक राज्यमंत्री तसेच कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक यांना कोल्हापूर चित्रनगरी विषय बाबत लवकरच मुंबई येते बैठक आयोजन करणेसाठी लेखी पत्र देण्यात येईल व कोल्हापूर चित्रनगरीसाठी जास्तीत जास्त निधी त्वरित उपलब्ध होणे बाबत महामंडळ पाठपुरावा करेल .......
त्यानंतर "दख्खनचा राजा जोतिबा "या सिरीयलचे कलाकार व तंत्रज्ञ यांची यावेळी भेट घेण्यात आली तसेच तेथील चित्रीकरण ची पहाणी करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी उप प्रमुख सौ. स्मिता मांडरे व सिने अभिनेते श्री. मंजित माने व अरुण भोसले(चोपदार), महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर व व्यावसायिक उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर व प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरी येथे भेट दिली
- Oct 12 2020