अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आज सांस्कृतिक मंत्री मा.श्री.अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये
★दर्जेदार मराठी चित्रपट अनुदान योजनेअंतर्गत प्रलंबित चित्रपटांचे परीक्षण लवकरात लवकर करण्यात यावे.
★परीक्षण झालेल्या चित्रपटांना अनुदानाची रक्कम वितरीत करावी,.
★ओटीटी प्लॅटफॉर्म वर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांना अनुदान मिळावे.
★चित्रपट व टि. व्ही.सिरीयल कलावंत व तंत्रज्ञ यांना रेल्वे प्रवास सुरु करण्यास परवानगी मिळावी.
या मागण्या करण्यात आल्या.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले, प्रमूख कार्यवाह श्री.सुशांत शेलार,निर्माते श्री.लक्ष्मीकांत खाबिया आदी मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आज सांस्कृतिक मंत्री मा.श्री.अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आले
- Sep 24 2020