गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सव २०२०
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे संस्थेच्या प्रमुख कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहेसंस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव,प्रमूख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर सौ.नम्रता आरडे,सिदेश मंगेशकर तसेच संतोष शिंदें, दिग्विजय कालेकर,अभिजित बारामते,सुधीर शेटके, सुनील मुसळे,राहूल मोरे,हणमंत जोशीं, राज पाटील,बबन बिरंजे इत्यादी मान्यवर सभासदानी बापट कॅम्प, कोल्हापूर येथून श्री बाप्पाच्या मूर्तीचे जयघोषात स्वागत करून दि.२१ रोजी प्रमुख कार्यालयात आगमन झाले आहे*
गणेश चतुर्थीला म्हणजेच शनिवार दि.२२ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता प्रमुख कार्यालय येथे संस्थेचे उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तसेच नित्यदिनी सकाळी ११ वाजता व सायंकाळी ६ वाजता श्री बाप्पाची आरती होईल सदर उत्सव सोशल डिस्टनसिंगचे व शासनाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.
तरी या गणेशोत्सव सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
***********
श्री.मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक आणि सेवकवर्ग
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ