कोल्हापूरचे भाग्यविधाता,दूरदृष्टीने अखंड समाजाला उज्वल भविष्याची दिशा देणारा द्रष्टा युगपुरूष, रयतेचा राजा, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे संस्थेच्या प्रमुख कार्यालयात आज दिनांक २६ जून रोजी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली संस्थेचे उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर व सहखजिनदार श्री. शरद चव्हाण यांच्या हस्ते राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी अर्जुन नलवडे,प्रमुख व्यवस्थापक रविंद्र बोरगावकर, सौ नम्रता गोडबोले, अभिनेते महादेव साळोखे, अरुण पाटील, मानसिग साळोखे, सिद्धेश मंगेशकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.