नाशिक मध्ये चित्रपटसृष्टी व्हावी आणि नाशिक मध्ये जास्तीत जास्त चित्रीकरण व्हावे या करिता नाशिकचे पालकमंत्री मा.श्री.छगन भुजबळ साहेबांची चित्रपट महामंडळाला नेहमीच मदत करत असतात...आज रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी श्री.सूरज मांढरे साहेब आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भागवत डोईफोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले..की चित्रपट, मालिका, वेबसिरीज इ. यांचे चित्रीकरण करण्यास निर्मात्यांना मुख्य करून ( ग्रीन झोन ) मध्ये परवानगी देण्यात यावी.. जेणे करून कलावंत, तंत्रज्ञ यांना रोजगार आणि चित्रपटसृष्टीला पुन्हा उभारी मिळू शकेल... या नुसार जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत जास्तीत जास्त चित्रीकरण झाले पाहिजेत त्यात मग मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ भारतातील सर्व अन्य भाषेतील सिनेमांच्या चित्रीकरणाकरिता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जन्मस्थळ नाशिक मध्ये स्वागतच आहे. याला माझे पूर्णपणे सहकार्य राहील अशी भावना वक्त करून.. आम्ही निर्मात्यांना परवानगी देऊ असे ठामपणे सांगण्यात आले....या प्रसंगी अ.भा.म. चित्रपट महामंडळाचे समिती सदस्य शाम लोंढे, रवींद्र जन्नावार, रमेश तलवार.अभिनेते चिन्मय उदगिरकर, व्यवस्थापक राहुल जाधव उपस्थित होते. या संदर्भात मदत ,परवानगी या बाबत काही माहिती लागल्यास खालील समिती सदस्यांशी संपर्क साधावा. श्री.शाम लोंढे - ९९२३७४५२३७ श्री. रवी जन्नावार - ९८५००६००४६