सासवड येथील एक कलावंत पिंपरी येथे स्ट्रगल करीत आहे.कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्र लाँक डावून केला गेला. हा कलावंत पिंपरीत अडकला. त्याच्या जेवणाचाही प्राँब्लेम सुरु झाला. एक दोन दिवस उपाशी राहिल्यानंतर त्याने चित्रपट महामंडळाशी संपर्क साधला. महामंडळातर्फे पिंपरी तील सभासदांना मदतीचे आवाहन करण्यात आले. दोन तासांनी सदर कलावंताचा एसएमएस आला की त्याला टिफिन मिळाला. याचवेळी महामंडळाचे क्रियाशील *कार्यकर्ते कँमेरामन मयुरेश जोशी* यांनी त्यांच्या मित्रिकरवी जोपर्यंत लाँकडाऊन असेल तोपर्यंत सदर कलावंताच्या जेवणाची सोय केली. मयुरेश आणि त्यांच्या मित्राचे मनापासून आभार