बीड ( प्रतिनिधी )
काल दिनांक 22 फेब्रुवारी 2020 रोजी बीड च्या आशा टॉकीज ला बायको देता का बायको या चित्रपटाच्या शो दरम्यान काही अज्ञात लोकांनी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सुरेश ठाणगे निर्माता धनंजय यमपूरे यांच्यावर हल्ला केला याचा निषेध करण्यासाठी घटनेचे गांभीर्य ओळखून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बीड शाखेत बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातील प्रमुख कलावंतांची समन्वय समिती प्रमुख डॉ.सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली या बाबत ठोस पावले उचलण्या संदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
घटना कळताच बीड शहरातील अनेक सुजाण कलावंत तातडीने मदतीसाठी धावून आले .
बीड जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे जो कलावंतांचा नेहमीच आदर करत आहे आणि राहणार.हल्ला करणारे नक्कीच बीडचे नाहीत हाच बैठकीत सूर आला.मात्र नाहक बीड ची बदनामी महाराष्ट्रभर झाली.
बीड महामंडळाने लेखक,दिग्दर्शक, आणि संबंधित टीम ला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाचाही संपर्क होऊ शकत नाही.महामंडळ अजूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.महामंडळ नेहमीच कलावंतांच्या पाठीशी आहे, पुण्यात या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला स्वतः महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले यांनी जातीने हजर राहून शुभेच्छा दिल्या.
सदर घटना ही नेमकी कुठल्या कारणाने घडली ,याला काही वैयक्तिक कारण आहे का ?
हे पोलीस चौकशी अंतीच समजू शकेल. आणि हल्ला झालेल्या कलावंतांनी कुठल्याही पोलीस स्टेशनात रीतसर तक्रार दाखल केली नाही. अथवा बीड चित्रपट महामंडळ शाखेशी ही संपर्क केला नाही . महामंडळाच्या वतीने पदाधिकारी व सदस्य यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले कि त्यांनी रात्रीच रुग्णालय सोडलेले आहे.
सदर घटनेचा बीड शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत, व महामंडळ याचा पाठपुरावा करत आहे. झालेली घटना निंदनीय असल्याने निषेध व्यक्त करण्यात आला.
सदर बैठकीस
डॉ. उज्वला वनवे, सतीश विटकर , शाहीरअनिल तिवारी,शाहीर विलास सोनवणे, मुकुंद धुताडमल, राजेश शिंदे, प्रशांत जाधव, अमोल अंकुटे, एजाज अली, रणजित वाघमारे, दीपाली रुईकर, नीलम वाघमारे, बीड शाखेचे व्यवस्थापक प्रमोद रामदासी आदी अनेक कलावंत उपस्थित होते..