*अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे.*
मा.मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ ला चित्रपट महामंडळाचा कारभार आपण हाती घेतला. आपला कँप्टन कसा आहे यावर टीमचा परफाँरमन्स अवलंबून असतो. अध्यक्ष झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मा.अध्यक्ष यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. जिथे चित्रपट महामंडळ नाव ही नव्हते अशा ठिकाणी भेट देवून, तेथील कलावंतांना विश्वासात घेऊन, त्यांना महामंडळाचे सभासदत्व देवून, या क्षेत्राविषयी त्यांच्या मनात विश्वास जागृत करून त्यांना प्रवाहात आणले. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे गावोगावचे कलावंत महामंडळाचे सभासद होऊ लागले. गावोगावी याच सभासदांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. नवकलावंत या क्षेत्रात शिक्षित होऊ लागले. नवकलावंतांना फसवणारी फेक आँडिशन यंत्रणा राज्यातील पोलिसांच्या मदतीने बंद पाडली. यामुळे तर याच कलावंतांना महामंडळ आपले वाटू लागले. महामंडळाच्या आँफीसमध्ये कलावंतांना मानाने विचारले जावू लागले. लवादामार्फत अनेक कलावंतांना आर्थिक बाबींमध्ये दिलासा मिळवून दिला. कलावंत हे प्रथम प्राधान्य ठेवून सरकार दरबारी त्यांच्या कामांना पुढे जाण्यासाठी वाव मिळू लागला, बिनधास्त पणे सर्वसामान्य सभासदांना अध्यक्षांची भेट मिळू लागली. कलावंतांच्या अनेक प्रोग्रामला अध्यक्ष उपस्थित राहू लागले त्याने या सर्वसामान्य कलावंतांचा उत्साह वाढू लागला. तमाम कलावंतांमध्ये अध्यक्ष भैय्या या नावाने ओळखले जावू लागले. एका भावाच्या नात्याने सभासदांची कामे कळण्याचा झपाटा अध्यक्षांनी लावला. वाढलेले सभासद, मिळालेला रेव्हेन्यू, प्रशासकीय पातळीवर घेतलेले कठोर निर्णय, अवास्तव प्रशासकीय खर्चाला लावलेली कात्री, यामुळे तयार झालेल्या ठेवी आणि या ठेवींमुळे महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी स्वमालकिच्या आँफीसची केलेली घोषणा आणि त्याच घोषणेची केलेली आज परिपूर्ती. पुणे १५०० स्क्वे.फूट, कोल्हापूर २२५० स्क्वे.फूट आणि मुंबई ११७५ स्क्वे. फूट अशा तीन आँफीसची खरेदी केली. आपले घर भक्कम करण्याचे प्रथम कर्तव्य घरातल्या कर्तबगार व्यक्ती चे असते. आणि भैय्यांनी ते केले आहे. याच आत्मीयतेने इतरही आफीसेस सर्व सभासदांच्या पाठिंब्याने भविष्यात महामंडळाच्या मालकिची करण्याचे काम भैय्यासाहेब करतीलच ही खात्री आहे. याचसोबत सभासदांचे प्रश्न सोडवणे, महामंडळाला कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन तयार करणे हेही काम ते निश्चितच करतील यात तिळमात्रही शंका नाही. अशा कर्तबगार अध्यक्षांसोबत काम करताना आपला खारीचा वाटा उचलायला मिळणे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
संजय ठुबे
खजिनदार- अ.भा.म.चि.म