मराठी नाटकातला दादा माणूस व्ही. शांताराम यांनी हेरला. नाटकातल्या सारखीच हुकुमत त्यांनी पिंजऱ्यात दाखवली आणि इंडस्ट्री ला एक सशक्त अभिनेता मिळाला. तेथून पुढे प्रवास सुरु झाला मराठी व हिंदी चित्रपटांचा. आपले वेगळे स्थान त्यांनी हिंदी इंडस्ट्रीत निर्माण केले होते. नाटक संपल्यानंतर आपले नाईटचे पाकीट बँक स्टेज आर्टिस्टला देणारे एकमेव अभिनेते ते होते.
अश्या अवलिया अभिनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली !
मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा