आज मुंबई मध्ये मा.श्री.प्रकाश जावडेकर साहेब-केंद्रीय मंत्री(माहिती व प्रसारण,भारत सरकार) यांच्या शुभहस्ते सेन्सॉर बोर्ड च्या नवीन लोगो चे अनावरण झाले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी मराठी चित्रपट सेंन्सॉर संमत करताना येणाऱ्या अडी-अडचणींबाबत मा.प्रकाश जावडेकर साहेब व सेन्सॉर बोर्ड चे चेअरमन श्री.प्रसून जोशी यांना निवेदन दिले व चर्चा केली.तसेच नवीन सेन्सॉर सर्टिफिकेट मध्ये बऱ्याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.