सस्नेह निमंत्रण,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च मानाचा चित्रभूषण पुरस्कार यावर्षी
मा.श्रीमती लीला गांधी-अभिनेत्री, नृत्यांगना
मा.श्री.भालचंद्र कुलकर्णी-अभिनेता
मा. श्री.विक्रम गोखले-अभिनेता,दिग्दर्शक
मा.श्रीमती सुषमा शिरोमणि-अभिनेत्री,निर्माती,दिग्दर्शिका, वितरक
मा. श्री.किशोर मिस्किन-निर्माता
मा.श्री.श्रीकांत धोंगडे-कला,प्रसिद्धी
यांना देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तसेच,मराठी चित्रपट सृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या १५ मान्यवर कलाकार व तंत्रज्ञ यांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मा. श्री.विनोद तावडे,सांस्कृतिक कार्य मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.१९ ऑगस्ट २०१९ रोजी सायं.६ वा. रवींद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी,मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम विनामूल्य आहे. तरी कृपया सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
आपले विनीत,
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष
धनाजी यमकर-उपाध्यक्ष
सुशांत शेलार-प्रमुख कार्यवाह
संजय ठुबे-खजिनदार तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ