अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले तसेच प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार,वर्षा ऊसगावकर-संचालिका,चैत्राली डोंगरे-संचालिका व शिष्टमंडळाने मा.सांस्कृतिक मंत्री श्री.विनोद तावडे यांची आज मंत्रालय येथे भेट घेतली.यावेळी त्यांनी फक्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्थाच महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता प्राप्त संस्था आहे.अन्य कोणत्याही संस्थेस शासनाने मान्यता दिलेली नाही हे स्पष्ट केले व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व्यतिरिक्त कोणत्याही अनधिकृत संस्थांच्या भूल थापांना कुणी बळी पडू नये असे आवाहन देखील केले आहे.