अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुखपत्र असणारे द्वैमासिक ' चित्रशारदा ' नुकतेच प्रकाशित झाले. Entertainment oriented असण्यापेक्षा Information orientated होण्याला प्राधान्य दिलेला हा अंक.
प्रत्येक व्यक्तीस केवळ वाचनासाठी नव्हे तर संग्रही ठेवण्यासाठी उद्यक्त करणारे हे द्वैमासिक.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं नेमकं काय आहे या अंकात...
या अंकात आहेत अनेक अनुभवी दिग्गज मान्यवरांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत. प्रभात चा 90 वर्षाच्या इतिहासाचा आढावा त्यांच्याच वंशजांकडून. 'ललिता पवारां'च्या आठवणी आहेत, आदेश बांदेकरांची एका वेगळ्या विषयावरची मुलाखत, स्वप्नील जोशी सांगतोय त्याच्या नव्या मालिकेबद्दल, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ' म्होरक्या ' चे दिग्दर्शक सांगताहेत त्यांच्या शॉर्टफिल्मचा अनुभव.
मातीतला तंबू सिनेमा बद्दल , महिलांच्या समस्यांबद्दल आशा कित्येक विषयांवर या अंकात प्रकाश टाकला गेलाय.
आणि एक न अनेक अनुभवी मंडळी आपले अनुभव येथे सांगत आहेत. सोबतच चित्रपट महामंडळाच्या व्यासपीठावर घडणाऱ्या ठळक घडामोडींची माहिती देखील याच अंकात आपल्याला पाहायला मिळेल. काही कलाकारांच समजाप्रति असणारं प्रेम , बांधिलकी लोंकांसमोर आणण्याचा प्रयत्न याच अंकात केलेला आहे.
आणि हो आगामी फिल्म्सच्या 'सेट' ला चित्रशारदा ची टीम भेट देते. त्याचा भन्नाट अनुभव सुद्धा या अंकात आपल्याला वाचायला मिळेल.
तर आजच आपली प्रत घेऊन ठेवा आणि वार्षिक सभासदत्व घ्यायला विसरू नका.