महाराष्ट्रातील सिने कलावंत, रंगमंच कलावंत आणि लोक कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुख -सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात मा.निलमताई गोऱ्हे-उप सभापती/आमदार (विधान परिषद) यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले तसेच प्रमुख कार्यवाह श्री.सुशांत शेलार व सर्व नगर पालिका, महानगर पालिका व फिल्म सिटी चे अधिकारी उपस्थित होते.