नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थांसाठी-
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था ५३वर्षांपासून कार्यरत आहे. सिने क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी व स्पाँट बाँय ते निर्माता यातील सर्व घटकांसाठी काम करणारी संस्था आहे. व्ही. शांताराम, सुधीर फडके, भालजी पेंढारकर, सुलोचना दिदी, गदीमा., अशांसारख्या धुरिणांनी ही संस्था सिने क्षेत्रात सुसंगतता येवून यातील सर्व विभागांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेली आहे. आपल्या कार्याने 'मात्रुसंस्था' या लौकिकाला ही संस्था पोचली आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांना केलेले साहाय्य, त्यांचे राबविलेले उपक्रम, त्यांच्या विश्वासाला पात्र झाल्यानेच टायटल रजिस्ट्रेशन, सेन्सॉर एनओसी, अनुदान योजनेसाठी एनओसी असे विशेष अधिकार सरकारने महामंडळाला दिलेले आहेत. ते एका रात्रीत मिळालेले नाहीत.
४०००० पेक्षा जास्त सभासद त्यामुळे झालेत. आज रोजी महामंडळाच्या विषयी एक विश्वास सर्वसामान्य सभासदाच्या मनात निर्माण झाला आहे. आपले काम महामंडळात होणारच हा दिलासा सर्वांना मिळाला आहे.
हे क्षेत्र योग्य रितीने पुढे न्यायचे असेल तर सगळे सिने साक्षर होणे जरुरीचे आहे. त्यातील सर्वात प्रथम आणि महत्वाचा घटक म्हणजे निर्माता होय. त्यालाच प्रथम साक्षर करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. त्याचा योग्य तो परिणाम ही दिसून आला आहे. अनेक फसव्या लोकांची दुकानदारी बंद झाली. महामंडळ राज्य सरकार व विविध चँनेल च्या मदतीने तयार चित्रपटांच्या मार्केटिंग साठी ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे. विविध स्टुडिओंच्या मदतीने अल्प दरात उच्च तंत्रज्ञान मराठी चित्रपटांना कसे मिळेल यावर काम करत आहे.
विविध फिल्म फेस्टिव्हल मध्ये मराठी फिल्म्सचा सहभाग कशाप्रकारे वाढवता येईल यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. विविध फिल्म बझार मध्ये मराठी फिल्म कशा विकल्या जातील यावर काम चालू आहे. कोणा एका निर्मात्याचाच फायदा करून न देता सर्वच निर्मात्यांना फायदा कसा होईल ह्यासाठी ठोस उपाय शोधत आहे.वेळ लागतो आहे त्यासाठी. वरवरचे व तात्कालिक उपाय कधीच कामाचे नसतात.
आज नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थांचे स्वागत च आहे. परंतु आक्षेप आहे तो त्यांनी आपल्या महामंडळाचे नाव मागेपुढे वापरण्यासाठी. यामुळे या संबंधित लोकांच्या हेतूविषयी च शंका आहे.ह्यांना खरंच काम करायचे आहे की, महामंडळाचे नाव व ५३ वर्षांचे महामंडळाचे गुडविल वापरुन नवीन दुकानदारी चालू करायची आहे. सावध तर सर्वांनी राहायला च पाहिजे. कारण यात भरडला जाणार आहे माझा सर्वसाधारण सभासद निर्माता. आजपर्यंत अशा अनेक संस्था आल्या, आपली पोळी भाजायचा प्रयत्न केला व लुप्त झाल्या. यांनी तात्कालिक वावटळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या आपल्या संस्थेच्या भक्कम पायाला धक्का ही बसवू शकल्या नाहीत. कारण या संस्थेवर काम करणारे बदलणारे आहेत परंतु संस्था अजेय व अभेद्य असणार आहे.
मेघराज राजेभोसले
अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal