अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ या नावाने नव्याने स्थापन झालेल्या संस्थेशी आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा काहीही संबंध नाही.
आपले नाव वापरून संबंधित लोक महामंडळाच्या लोकप्रिययतेचा आणि गुडविलचा वापर करून नव निर्मात्यांच्या मनात संभ्रम निर्माण करित आहेत. 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' हे नाव आपण ट्रेडमार्क खाली नोंदलेले आहे. तसेच ह्या नावाचा काँपी राईट आपला आहे. यातील अक्षरे अन्य कोणी वापरु शकत नाही. संबंधित लोकांना ही महामंडळाने कायदेशीर नोटिस पाठविलेली आहे.
आपली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था केन्द्र सरकार मान्य आहे. कारण आपण सेन्सॉर साठी आपले एनओसी.ग्राह्य धरले जाते. आपले महामंडळ राज्य सरकार मान्य आहे कारण आपल्या एनओसी शिवाय निर्मात्यांना अनुदान दिले जात नाही. शिवाय राज्य सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या कलावंतांच्या योजनांसाठी आपल्या महमंडळाची शिफारस कलाकार म्हणून ग्राह्य धरली जाते. त्यामुळे आपल्या नावाचा आयता फायदा मिळावा म्हणून संबंधितांनी त्यांच्या संस्थेचे नाव आपल्याशी साधर्म्य असेल असे ठेवले आहे. यातूनच संबंधितांच्या हेतूविषयी शंका येते.
कोणीही संबंधित व्यक्तींशी व्यवहार करताना सावधानतेने करा. फसू नका.
सुशांत शेलार
कार्यवाह- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. (ओरिजनल)
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal