अनेकदा अनेक कलाकार वेगवेगळ्या वयाचे वेगवेगळ्या ठिकाणचे भेटतात ज्यांना अभिनय,दिग्दर्शन अशा क्षेत्रात करीयर करायची इच्छा असते आणि अभिनय क्षेत्रा बाबत ते अनेक प्रश्नही विचारतात यात काही प्रश्न खूप कॉमन असतात ते म्हणजे :
• आम्ही खूप ऑडिशन दिल्यात पण आमची निवड नाही झाली ,ऑडिशन नक्की कशी द्यावी ?
• एवढ्या नवीन मालिका,चित्रपट होतात त्यांच्या ऑडिशन नक्की कुठे होतात ?
• ऑडिशन देण्यासाठीची पूर्वतयारी कशी करावी ?
• ऑडिशन कळण्यासाठी काय करावं लागतं ?
• अॅक्टिंग करण्यासाठी कार्ड काढावं लागेल का ?
• माणसाने कार्ड आणि पोर्टफॉलियोचे पैसे सांगितलेत तर काय करू एवढे पैसे, खर्च असतात का ?
• ऑडिशन द्यायला पैसे द्यावे लागतात का ?
• आम्हाला जर कोणी फसवलं तर आम्ही कुठे तक्रार करायची ?
• या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तसच ऑडिशन कशी द्यावी या याबद्दल योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
आणि
वेध ऐक्टिंग अकैडमी
आयोजित करतोय
ऑडिशन कशी द्यावी ?
मार्गदर्शनपर कार्यशाळा (विनामूल्य)
नामवंत दिग्दर्शक,अभिनेते,कास्टिंग डायरेक्टर यांचे मार्गदर्शन
दिनांक - शनिवार १८ मे रोजी संध्याकाळी ५ ते ८
स्थळ-वक्रतुंड हॉल,गणेश मंदिर,फडके रोड, डोंबिवली(पु)
या कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य असेल परंतु
नावनोंदणी आवश्यक आहे
नक्की सहभागी व्हा
वयोगट १६ वर्ष आणि पुढे
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal