अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले यांनी सावंतवाडी येथे सुरु असलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी भेट दिली व सेटवरील निर्माते,कलाकार - तंत्रज्ञ यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या यावेळी निर्माते श्री.सुनील भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.याप्रसंगी दिग्दर्शक श्री.राजू सावंत तसेच कलाकार श्री.माधव अभ्यंकर (आण्णा),अपूर्वा नेमळेकर (शेवंता) इत्यादी कलाकार उपस्थित होते. सावंतवाडी येथे मराठी चित्रपट महामंडळाचे जनसंपर्क कार्यालय लवकरच सुरु करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal