*जाहीर आभार*
*सर्व सभासद बंधू भगिनींना,*
*नमस्कार*.!
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सर्व साधारण सभा नुकतीच श्री शाहू सांकृतिक मंदिर कोल्हापूर येथे संपन्न झाली. या सभेत अनेकविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. आपण सर्वांनी सभा यशस्वी पणे पार पाडली आणि आम्हा सर्वांना साथ दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. यापुढेही असेच सहकार्य लाभावे ही विनंती*.
*आपला*
*मेघराज राजेभोसले*
*अध्यक्ष ,पदाधिकारी आणि संचालक मंडळ **
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*