*नम्र आवाहन* -
सभासदांना देण्यात येणारे कार्ड हे उशीरा मिळण्याची कारणे.
सभासदांना स्मार्ट कार्ड देण्याची आखलेली ही नविन योजना आहे.
◆ आपण भरलेला फॉर्म हा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कुरीयरने प्रमुख अॉफीसमध्ये (कोल्हापूरला) पाठवला जातो. तेथे फॉर्म व्यवस्थित तपासून त्यावर सभासद क्रमांक टाकला जातो.
◆ सभासद क्रमांक टाकल्यानंतर फॉर्म पुण्यातील एजन्सीकडे स्कॕनिंगसाठी पाठवला जातो.
◆ स्कॕन केलेला फॉर्म प्रिंन्टिंगसाठी सांगलीतील एजन्सी कडे पाठवला जातो. ◆ प्रिंन्टिंग केलेले कार्ड महामंडळाचा लोगो स्पॉट युव्ही करणेसाठी बेंगलोरला पाठविले जाते.
◆ युव्ही करुन सभासद क्रमांक एम्बॉस करणेसाठी मुंबईला पाठविले जाते.
◆ त्यानंतर कार्ड पुन्हा मूळ एजन्सी सांगलीला जाते.
◆ सांगलीमधून प्रमुख अॉफीस कोल्हापूर येथे फायनल डिलीवरी दिली जाते.
◆ कोल्हापूर अॉफीसमधून ज्या अॉफीसला फॉर्म भरला त्या अॉफीसला कार्ड पाठविले जाते.
◆ अंतिम वितरण त्या त्या अॉफीसमधून प्रत्यक्ष किंवा पोस्ट अथवा कुरीयर द्वारे सभासदांना कार्ड दिले जाते.
● *या शिवाय एकएक असे स्वतंत्र कार्ड छापले जात नाही. एक छपाई लॉटसाठी किमान २०० कार्डांची आवश्यकता असते.*
आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्या हातात कार्ड पडेपर्यंत कालावधी त्यामुळे जास्त लागतो.
ही प्रक्रिया अधिक सुलभ करुन कार्ड सभासदांना लवकरात लवकर कसे देता येईल यावर काम चालू आहे. तूर्तास विलंब लागतो त्यासाठी सभासदांचे सहकार्य आवश्यक आहे.
*अध्यक्ष - अ.भा.म.चि.म.*
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal