*संगितातील ' देव ' हरपला*
ज्येष्ठ कवी, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांचे प्रकृती अस्वास्थ्याने , काल रात्री १.३० वाजता निधन झाले.
यशवंत देव उर्फ नाना, हे फार मोठे संगीतकार, गायक आणि कवी होते. शब्दप्रधान गायकीचे ते जनक होते.
'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', 'दिवस तुझे हे फुलायचे', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'स्वर आले दुरुनी', 'असेन मी नसेन मी', 'अखेरचे येतील माझ्या...' अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देवांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केलं होतं. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकासाठीही संगीत दिलं होतं.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !