अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी २ दिवसीय अभिनय कार्यशाळा दि.०५ व ०६ सप्टेंबर २०१८ रोजी.*
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद ,
एम जी एम कॉलेज ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन फिल्म आर्टस् विभाग औरंगाबाद
व मिडिया मॅजिक इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी २ दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन आईन्स्टाईन हॉल एम जी एम कॅम्पस एन-६,सिडको औरंगाबाद येथे दिनांक ०५ आणि ०६ सप्टेंबर २०१८
वेळ:-सकाळी १० ते ०६ वाजे पर्यंत करण्यात आले आहे.
दि.५ तारखेला दु.४.३०वा. औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अंकुशराव जी कदम सर(सचिव एम जी एम) हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे श्री. मेघराज जी राजेभोसले ( अध्यक्ष:-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)
तसेच या कार्यक्रमाचे उदघाटन हे डॉ.रेखाजी शेळके, श्री.शिव जी कदम तसेच जाई देशमुख कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील नाईक यांचे मार्गदर्शन हे मिळणार आहे. अ.भा.म.चि.म.च्या सभासदांसाठी ही कार्यशाळा मोफत आयोजित केली आहे . अॉनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे .
तरी या दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी ही विनंती.
०५ सप्टेंबर २०१८ ला दुपारी ०४:३० वा. औपचारिक उद्धाटन आहे आणि या अभिनय कार्यशाळेचा समारोप हा दि.०६ सप्टेंबर रोजी दुपारी ०४:३० वा. सुप्रसिद्ध अभिनेते माधवजी अभ्यंकर व बिग बॉस फेम औरंगाबादची अभिनेत्री ऋतुजाजी धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
टीप:-१:-अभिनय कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सोबत लिंक देत आहोत.
http://mgmjournalism.org/filmarts/abhinay-workshop.html
२:-दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे बंधनकारक आहे कारण प्रवेश मर्यादित आहेत.
अधिक माहिती साठी :-श्री.शिव जी कदम मो.८४५९३८२५५०(एम जी एम कॉलेज ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन फिल्म आर्टस् विभाग औरंगाबाद)
श्री.शुभम जी त्रिभुवन मो.८६५७०९९९९८(शाखा अधिकारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद)
श्री.जॉन जी भालेराव मो.९७६३९३८१०७(प्रसिद्धी प्रमुख अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद)
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #zee #zeemarathi