जुन्या काळात म्हणजे ज्यावेळी चित्रपट बनवताना सगळेजण एक परिवार म्हणून एकत्र यायचे.आपापली सुखदुःख वाटून घ्यायचे. निर्माता म्हणजे कर्ता पुरुष असायचा या काळातला एक अस्सल कलावंत व माणुसकीचा झरा म्हणजे *चारुकाका* होते. आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते संस्थापक सदस्य होते.या मार्फत कलावंतांची सेवा तर ते करत होतेच परंतु आपल्या क्षेत्रातील कोणीही कलावंत त्यांच्याकडे जावून हक्काने राहू शकत होता. राहण्याची , खाण्याची सर्व व्यवस्था न सांगता चारुकाका करत होते.कलावंतांंचं माहेरघर म्हणजे पूना गेस्ट हाऊस होते.
असे चारुकाका आज खर्या अर्थाने कलावंतांना पोरकं करुन गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्व सरपोतदार परिवाराला परमेश्वर या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
.......................................................
अध्यक्ष , पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी वर्ग - अ.भा.म.चि.महामंडळ
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal