*निषेध निषेध निषेध *
गोवा येथील ४८व्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला.
रवी जाधव यांच्या च्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता.
बहुधा चित्रपटाचे शीर्षक (title) याला कारणीभूत असावे. परंतु केवळ नावामुळे एखादा चित्रपट नाकारणे हा चित्रपटकर्त्यावर व पर्यायाने प्रेक्षकांवर पूर्ण अन्याय आहे.
यास्तव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या कृतीचा तीव्र निषेध करीत आहे.या संदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व चित्र कर्त्यावर होणारा अन्याय दूर करून प्रेक्षकांना एका चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याची संधी द्यावी.
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष
तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm