अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ वार्तालाप
अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या चेन्नई येथील महत्वाच्या बैठकीला सह कार्यवाह श्री.विजय खोचीकर यांची उपस्थिती.
प्राण्यांना घेऊन चित्रिकरण करणे ही चित्रनिर्मितीमधली कायमची गरज आहे.पण गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात प्राणी,पक्षी यांचे चित्रिकरण असल्यास त्यासाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.अन्यथा सेन्सॉर प्रमाणपत्र मिळत नाही.आणि ते चित्रपट निर्मात्यांना खूप डोकेदुखीचे होऊन बसले आहे. या गोष्टी निर्मात्यांना कमीत कमी कटकटीच्या व्हाव्यात या विचाराने या द साउथ इंडिअन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांनी पुढाकार घेऊन अॅनिमल वेल्फेअर बोर्डाबरोबर दिनांक ९नोव्हेबर २०१७ रोजी चेन्नई येथे विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सह कार्यवाह श्री.विजय खोचीकर यांनी या बैठकीला सक्रीय हजेरी लावली व या संदर्भातल्या आपल्या अडचणी व त्यावरचे उपाय यांची बैठकीसमोर मांडणी केली. महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या चित्रपटांची संख्या पाहता वेल्फेअर बोर्डाचे मुंबईत कार्यालय असणे हे गरजेचे आहे,जेणेकरून निर्मात्यांचा खूप वेळ व कष्ट वाचू शकतील,तसेच वेल्फेअर बोर्डाने ऑनलाईन प्रक्रियाही सुरु करावी या गोष्टींची मागणी श्री. खोचीकर यांनी केली. वेल्फेअर बोर्डाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या दृष्टीने जलदीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm