*नटसम्राट निळू फुले रंग मंदिरचे उद्घाटन संपन्न*
आज रोजी पिंपरी चिंचवड मधील नवीन नाट्य मंदिर *नटसम्राट निळू फुले रंग मंदिरचे* डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। यावेळी स्थानिक आमदार व पालिका आयुक्त यांच्या तर्फे *डॉ श्रीराम लागूंचा* विशेष सत्कार करण्यात आला।
सदर कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहयोगाने निळूभाऊ फुले कला अकादमी सोबत पिंपरी चिंचवड महापालिकेने 3 दिवसीय *निळूभाऊ फुले महोत्सव* चे आयोजन केले होते। आज समारोपाच्या कार्यक्रमात सदर नाट्य मंदिराचे औपाचरिक उदघाटन पार पडले। यावेळी आ. लक्ष्मणराव जगताप व पालिका आयुक्त यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या वेळी *आठवणीतले निळूभाऊ* या विषयावर बोलण्यासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यात जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सुषमा शिरोमणी, ज्योती चांदेकर, राहुल सोलापूरकर आदींनी निळूभाऊनसोबतचा आपला अनुभव व्यक्त केला व निळूभाऊंना एक कलाकारासोबत माणूस म्हणून किती महान होते, याबद्दलची आपली भूमिका मांडली। समारोपाच्या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले।
-दिपक चौधरी
( जनसंपर्क प्रमुख, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ )
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm