दि. २८ मे रोजी झालेली पुण्यातील भरारी पथकाची कामगिरी.
कानिफनाथ माळी, पंढरपुर यांच्या जाई-जुई क्रिएशन तर्फे भिरुड या सिनेमासाठी घेतले जाणारे अॉडिशन भरारी पथकाने बंद पाडले.
महामंडळाची रितसर परवानगी घेऊन सुध्दा महामंडळाचा कोणत्याही प्रकारची फी आकारु नये हा नियम मोडल्याबद्दल सदर कारवाई करण्यात आली.
अॉडिशनच्या नावाखाली ५०० ते १००० रु. प्रोसेसिंग फी व अॉडिशन किटच्या नावाखाली निर्माते कलाकारांना पैश्याची मागणी करत होते. परंतु भरारी पथकाने कलाकारांची फसवणूक होण्याआधीच कायदेशीर कारवाई करून सदर अॉडिशन प्रक्रियाच संपूर्णपणे बंद करायला लावली.
याकामात नुमवी मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कारवाईत भरारी पथक सदस्य विनय जवळगीकर व सचिन वाडकर यांनी भाग घेतला.