१४ मे ला झी युवा संगीत सम्राटच्या मुंबई विभाग ऑडिशन्स ठाण्यात !!
नागपूर , औरंगाबाद, नाशिक , पुणे आणि कोल्हापूर मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची संगीत सम्राटाची टीम आता मुंबई , नवी मुंबई ठाणे , कल्याण , डोंबिवली , रायगड येथील गुणी कलाकारांचा शोध घेत आहेत आणि त्यामुळेच मुंबई मध्ये होणाऱ्या संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या ऑडिशन मराठी माणसाच्या घराघरात पोहचण्यासाठी ठाणे विभाग निवडला आहे . या ऑडिशन शुक्रवार १४ मे ला सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान ब्राह्मण शिक्षण मंडळ प्राथमिक विद्यालय , घंटाळी देवी मंदिर रोड , नौपाडा ठाणे पश्चिम महाराष्ट्र ४००६०२ येथे आयोजित करण्यात आले आहेत .
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध , माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे . या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे असे नाही , संगीत सम्राट हा कार्यक्रम गायकांसाठी आहे तेवढाच अश्या कलाकारांसाठी सुद्धा आहे जे कोणत्याही वाद्द्यापासून , वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीत बनवू शकतील . या कार्यक्रमात मुख्यतः गायन , वाद्य वाजवणे , तोंडाने आवज काढून संगीत बनवणे ( Acapella , Beat Boxing ) असे परफॉर्मन्स सुद्धा असतील. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता . वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके , बँड , गावागावातील संगीत , प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल . महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे . या ऑडिशनला कसलीही फी नाही . त्यामुळे कोणालाही कसलेलंही पैसे दयायची गरज नाही . ऑडिशनच्या जागी येऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे . ज्याच्यापासून संगीत निर्मिती होऊ शकते अशी वाद्ये किंवा अश्या वस्तू स्पर्धक घेऊन येऊ शकतात. गवेगळ्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत.
३ मे ला नागपूर , ६ मे ला औरंगाबाद आणि ८ मे ला नाशिकमध्ये , १० मे ला पुण्यात आणि १२ मे ला कोल्हापूर मध्ये तुफान गर्दीमध्ये झाल्या . अनेक स्पर्धक तबला , डमरू , ढोल ताशे , पेटी , सूरसोटा , एकतारी , रुद्रवीणा , बीन , तुणतुणे , ढोलक , मृदूंग , खंजिरी , डफली , नगारा , , डमरू , घुंगरू , खुळखुळा , ट्रँगल घंटा , सरोज , गिटार , सतार , संतूर , तंबोरा , कीबोर्ड , , सनई , बासरी , व्हायोलिन , स्टील चे डबे , काठ्या , बांबू अशी अनेक निरनिराळी वाद्ये घेऊन येऊन , त्यांच्या साहाय्याने स्पर्धकांनी ऑडिशन्स गाजवल्या आहेत आता कोल्हापुरी स्पर्धक काय काय घेऊन येतील यांच्याकडे परीक्षकांचे लक्ष असणार आहे .
संगीत सम्राट हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे .छोट्या पडद्यावर या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल .संगीत सम्राट ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . झी युवाच्या संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे जज आहेत.