१२ मे ला झी युवा संगीत सम्राटच्या ऑडिशनला कोल्हापूरकर करणार कल्ला !!
नागपूर , औरंगाबाद, नाशिक , पुणे मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची संगीत सम्राटाची टीम आता कला आणि संस्कृतीने बहरलेल्या आणि मर्दानी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या रांगड्या कोल्हापूर मध्ये दाखल झाली आहे . कोल्हापूरकर नेहमीच कलेची कदर करतात आणि त्यामुळेच कोल्हापूरमध्ये होणाऱ्या संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या ऑडिशनला कोल्हापूरकर कल्ला करतील याची झी युवाला खात्री आहे . या ऑडिशन शुक्रवार १२ मे ला सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान प्रायव्हेट हाईस्कूल २५६०/ बी , खासबाग , मंगलेश्वर पेठ , कोल्हापूर महाराष्ट्र - ४१६०१२ येथे होणार आहे . ज्या प्रमाणे इतर शहरांमधील गुणी स्पर्धक निवडले गेले त्याचप्रमाणे कोल्हापूर कलेची योग्य पारख करून झी युवा निवड प्रक्रिया पूर्ण करेल .
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध , माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे . या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे असे नाही , संगीत सम्राट हा कार्यक्रम गायकांसाठी आहे तेवढाच अश्या कलाकारांसाठी सुद्धा आहे जे कोणत्याही वाद्द्यापासून , वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीत बनवू शकतील . या कार्यक्रमात मुख्यतः गायन , वाद्य वाजवणे , तोंडाने आवज काढून संगीत बनवणे ( Acapella , Beat Boxing ) असे परफॉर्मन्स सुद्धा असतील. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता . वयाच्या ४ वर्षांपासून ते आयुष्याच्या कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ढोलपथके , बँड , गावागावातील संगीत , प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल . महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे . या ऑडिशनला कसलीही फी नाही . त्यामुळे कोणालाही कसलेलंही पैसे दयायची गरज नाही . ऑडिशनच्या जागी येऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे . ज्याच्यापासून संगीत निर्मिती होऊ शकते अशी वाद्ये किंवा अश्या वस्तू स्पर्धक घेऊन येऊ शकतात. गवेगळ्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत. ३ मे ला नागपूर , ६ मे ला औरंगाबाद आणि ८ मे ला नाशिकमध्ये आणि १० मे ला पुण्यात तुफान गर्दीमध्ये झाल्या . अनेक स्पर्धक तबला , डमरू , ढोल ताशे , पेटी , सूरसोटा , एकतारी , रुद्रवीणा , बीन , तुणतुणे , ढोलक , मृदूंग , खंजिरी , डफली , नगारा , , डमरू , घुंगरू , खुळखुळा , ट्रँगल घंटा , सरोज , गिटार , सतार , संतूर , तंबोरा , कीबोर्ड , , सनई , बासरी , व्हायोलिन , स्टील चे डबे , काठ्या , बांबू अशी अनेक निरनिराळी वाद्ये घेऊन येऊन , त्यांच्या साहाय्याने स्पर्धकांनी ऑडिशन्स गाजवल्या आहेत आता कोल्हापुरी स्पर्धक काय काय घेऊन येतील यांच्याकडे परीक्षकांचे लक्ष असणार आहे .
संगीत सम्राट हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे .छोट्या पडद्यावर या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल . . या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स ३ मे पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत. ३ मे ला नागपूर , ६ मे ला औरंगाबाद आणि ८ मे ला नाशिक , १० मे पुण्या मध्ये तुफान गर्दीमध्ये झाल्या . पुण्यानंतर १४ मे ला मुंबईमध्ये ब्राम्हण शिक्षण मंडळ प्राथमिक विद्यालय नौपाडा ठाणे येथे ह्या ऑडिशन्स घेतल्या जातील .संगीत सम्राट ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . झी युवाच्या संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे जज आहेत.