३ मे ला गुलराज सिंग चे स्वर मनामनात रुजणार
झी युवावर सरगम सजणार
काही संगीतकार केवळ मोठ्या सिनेमा मुळे नाही तर त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे लोकांच्या मनावर राज्य करतात . गुलराज सिंग हे त्यातल्याच एका उत्कृष्ट संगीतकाराच नाव . झी युवा, "सरगम "या कार्यक्रमाद्वारे या अप्रतिम व्यक्तिमत्वाला या बुधवारी ३ मे आणि गुरुवारी ४ मे रात्री ९ वाजता महाराष्ट्रासमोर घेऊन येत आहे.
लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या गुलराज यांना घरच्यांना पूर्ण पाठिंबा मिळाला . ए . आर . रहमान यांच्या रोजा मध्ये वाजवलेल्या संगीताकडून स्फूर्ती घेऊन गुलराज यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला . पुढे शंकर एहसान लॉय या संगीतकारांकडे आपली कला दाखवण्याची त्यांना संधी मिळाली आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पहिले नाही . संगीतातील देव ए . आर . रहमान यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलं . हिंदी इंडस्ट्रीतील अनेक मोठी गाणी आज त्यांच्या नावावर आहेत . उंगली सिनेमातील पाकिजा हे गाणं नावाजले गेले . असे हे नावाजलेले संगीतकार झी युवाच्या या भागात पाहायला मिळणार आहे . गुलराज सिंग यांच्या भागात आपल्याला वादळ वारा , स्वर सले , ना दिले , जिवा शिवाची बैल जोडी , दिल की तपीश , वल्लव वल्लव , , वारे वारे , मोगरा फुलला , मेडलि आणि गोंधळ असे मराठी मातीतील संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहेत . कविता कृष्णमूर्ती , अभिजीत सावंत अशी अनेक मोठमोठ्या नावांनी झी युवाची ही संगीतमय सरगम सजणार आहे .
सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत ."सरगम" या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. "सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.