महाराष्ट्र कर्नाटक कला संस्कृती समेट मा. धनाजी यमकर,उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसेच श्री रविंद्र गावडे व श्री अश्विन सावनूर यांनी कर्नाटक फिल्म असोसिएशनचे अध्यक्ष मा. एस व्ही राजेंद्र सिंग बाबू, श्री दिनेश (रजिस्ट्रार), व नॅशनल अवार्ड विजेते (2017) दिग्दर्शक श्री निखील मांजू यांची बेंगलोर येथे भेट घेऊन मराठी व कन्नड चित्रपटांच्या माध्यमातून दोन्ही चित्रपट संस्कृती कशी जवळ येईल व त्याचा विस्तार कसा करता येईल अशा विविध विषयावर चर्चा केली. साधारणतः ह्या चर्चेतील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. कन्नड चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात करावे मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कर्नाटकात करावे यासाठी कर्नाटक असोसिएशन व चित्रपट महामंडळ एकमेकांना जी काही लागेल ती मदत करतील, यामुळे दोन्ही सिनेमांना नवनवीन लोकेशन्स मिळतील व सिनेमाची व्याप्ति वाढेल. कर्नाटक फिल्म असोसिएशन फक्त मराठी चित्रपटांसाठी बेंगलोर येथे दरवर्षी फिल्म फेस्टिवल भरवेल व या फेस्टिवलसाठी मराठीतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व तंत्रज्ञ यांना आमंत्रित करतील तसेच अ भा म चित्रपट महामंडळ कन्नड चित्रपटांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापुर पैकी एका ठिकाणी दरवर्षी फिल्म फेस्टिवल भरवेल व या फेस्टिवलसाठी तेथील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व तंत्रज्ञ यांना आमंत्रित करतील