*सावधान*
************************
श्री.जयप्रकाश पाटील ह्या व्यक्ती विरुद्ध सौ. अश्विनी काळे व इतर लोकांनी आर्थिक फसवणुकीसंदर्भात महामंडळामध्ये तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.तरी या व्यक्तिवरील आरोप व गुन्हे सिद्ध झाल्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द केलेले आहे तसेच त्यांचे साथीदार श्री.अमित काकड़े व श्रीमती वंदना खंडागळे यांचे सभासदत्व तात्पुरते स्थगित केलेले आहे.
तरी या व्यक्तीशी आर्थिक अथवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार केल्यास त्यास महामंडळ जबाबदार रहाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्रच्या सरचिटणीस सौ. शीतल करदेकर यांनी केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ त्यांचे आभार मानत आहे.
************************
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ