अपात्र मराठी चित्रपटांचे पुनर्रपरिक्षण होणार...
महामंडळाच्या विनंतीवर सांस्कृतिक कार्य मंत्री यांचा सकारात्मक निर्णय•
*************
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री.मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने काल दि.३०/११/१०१६ रोज़ी सांस्कृतिक कार्य मंत्री मा.श्री विनोद तावडे साहेब यांची भेट घेतली.या भेटीत मराठी चित्रपट अनुदान,वृद्ध कलाकार- तंत्रज्ञ मानधन, स्नेह संमेलन तसेच मराठी चित्रपट सृष्टीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष आग्रही होते. आणि त्यांच्या मागणीला सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे साहेबांनी तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मराठी चित्रपट सृष्टीत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.