गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -२०१६ या महोत्सवासाठी दि.१ ऑगस्ट २०१५ ते दि. ३१ जुलै २०१६ या कालावधीत सेंन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका निर्मात्यांकडून मागवण्यात येत आहेत.महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेशिका भरून मा.सह व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ,दादासाहेब फाळके चित्रनगरी,गोरेगाव (पूर्व) मुंबई-६५ या पत्त्यावर दि.३ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोहचतील या बेताने पाठवाव्यात.
अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org या संकेत स्थळावर अथवा मो.नं. 92 70 318831 या क्रमांकावर संपर्क साधावा.
***********************************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ