सर्व मराठी रसिक प्रेक्षक व निर्मात्यांचा ह्दयात स्थान निर्माण केलेलं पुण्यातील आपले हक्काचे चित्रपटगृह किबे लक्ष्मी (प्रभात) हे कायमस्वरुपी फक्त *मराठी* चित्रपटासाठी उपलब्ध रहावे. महाराष्ट्रातील सर्व एकपडदा चित्रपटगृहे हे हिंदीप्रमाणेच *मराठी चित्रपटासाठी देखील* शेअरिंग बेसीसवर निर्मात्यांना मिळावेत. यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल...!
यासाठी बुधवार दि. *२४ अॉगस्ट २०१६ रोजी दु. १२.३० वा* चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी व चित्रपट निर्माते किबे लक्ष्मी थिएटरच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे.
आपले,
मेघराज राजेभोसले,
अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, व सर्व संचालक, पदाधिकारी