महाराष्ट्र शासनाच्या अनुदान योजनेवर तातडीने चर्चा करण्यासाठी तसेच मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची मिटिंग अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०१६ रोजी मिनी थिएटर,रविंद्र नाट्य मंदिर,प्रभादेवी,मुंबई येथे आयोजित करण्यात आली.यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.मेघराज राजेभोसले तसेच पदाधिकारी,संचालक व निर्माते मान्यवर,सभासद उपस्थित होते.