ते आले ..... त्यांनी पाहिलं .... त्यांनी जिंकलं . निमित्त होतं ........ २९ मे च्या मोफत अभिनय शिबीराबाबतच्या सेमिनारचं . ७१० एवढीचं आसन व्यवस्था असणाऱ्या नेहरू हॉल मध्ये जवळ-जवळ १५०० लोकांची तोबा गर्दी झाली होती . आमच्या कल्पनेच्या पलीकडेही एवढा प्रतिसाद अपेक्षित नव्हता . पण खंत या गोष्टीची वाटते कि बसायला वा उभं रहायलाही ज्याना जागा मिळाली नाही त्यांना परत जावे लागले त्यांची सर्वांची मी माफी मागतो. उपस्थितीत पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती त्या " दिग्गज नटश्रेष्ठाची " . सर्वांचे डोळे त्यांच्या आगमनाकडे लागलेले असताना व्यासपीठावर " नटश्रेष्ठाची " पाऊले पडली आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष करत त्यांचे स्वागत केले . तब्बल २ तास विक्रम सरांनी अभिनयाच्या बाबतीत मोलाचे धडे देत सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवले होते . बऱ्याच लोकांनी आपापले प्रश्न त्यांच्या समोर मांडले . त्यांची समाधानकारक उत्तरेही त्याना मिळाली . सर्वांना आनंद याचा होता कि , त्यांना सरांसोबत थेट संवाद साधता आला . या कार्यक्रमात आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले सर , प्रसिद्ध कार्यकारी निर्माते श्री.संजय ठुबे सर , नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे , वेशभूषाकार चैत्राली डोंगरे , मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष श्री.दिपकजी चव्हाण , दिग्दर्शक जितू वाईकर व श्रीधर मूर्ती , कॅमेरामन मयूर जोशी यांनीही सर्वांसोबत दिलखुलासपणे संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना चित्रपट कर्मचारी सेनेचे पदाधिकारी श्री. दिनेश भोसले , लाईन प्रोड्यूसर इम्रान शेख यांचाही सन्मान करण्यात आला . आता दिनांक १जून २०१६ पासून विक्रमजी गोखले यांच्या अभिनय कार्यशाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा. त्यासाठी ९८५०९०७३१३ व ०२०- ६५२४२१२१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
New trailer
New movies
-
Ekda Kaay Zala
Ekda Kaay ZalaDetails
-
Mogra Phulaalaa
Mogra PhulaalaaDetails
-
Pondicherry
PondicherryDetails
-
Aamhi Befikar
Aamhi BefikarDetails
-
Shimga
ShimgaDetails
-
Anandi Gopal
Anandi GopalDetails
-
Dombivli Return
Dombivli ReturnDetails
-
Perfume
PerfumeDetails
-
Ek Nirnay... Swatahacha Swatasathi
Ek Nirnay... Swatahacha SwatasathiDetails
-
Mauli
MauliDetails





