माझ्या सर्व सभासदांना गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा. आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो की कृपया कोणीही विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबत गैरसमज करून घेऊ नये. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करायचा आमचा प्रयत्न आहे. सप्टेंबर अखेरीस सर्वसाधारण सभा घेणे सार्वजनिक न्यासाच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. ह्याच कायद्यात झालेल्या अमेंडमेंट नुसार घटना दुरुस्ती शिफारशी विशेष सर्वसाधारण सभेत चर्चा घडवून आणणे अत्यावश्यक आहे. व सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता घेणे बंधनकारक आहे. सप्टेंबर अखेरीस दोन्ही सभा घेणे क्रमप्राप्त झालेने विशेष सर्वसाधारण सभा गणपती असतानाही घ्यावी लागते आहे. खरेतर कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण बाप्पांच्या पुजनाने करत असतो. मग बदलत्या काळानुरुप घटनाबदलाला आजपर्यंत झालेला उशीर लक्षात घेऊन आपण १२सप्टेंबर रोजी सभेत घटना दुरुस्तीवर चर्चा करणार आहोत. या दुरुस्तीच्या या कामात आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कामातून गणपती बाप्पाची विशेष पुजा करावी. आपल्या महामंडळाचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने घटनेनुसार ही सभा तिथेच घेणे बंधनकारक आहे. नाहीतर संचालक सभा इतरत्र घेण्याचा पायंडा आम्ही पाडला आहेच. आमचे संचालक मंडळ मालक म्हणून काम न करता सेवक म्हणून काम करीत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये आपपर भाव आम्ही करीत नाही. सभेच्या सुचनेचे पञ व घटना दुरुस्तीच्या शिफारशी वेळेत सर्व अ वर्ग सभासदांना मिळाव्यात म्हणून वेळेआधीच म्हणजे दिनांक २४,२५ व २६ अॉगस्ट रोजीच ५५५० सभासदांना पोष्टात टाकलेल्या आहेत. खूप लोकांचे मिळाल्याचे फोनही आले आहेत.आता प्रश्न राहतो तो ही माहीती whatsapp ला का नाही टाकली. तर हे माध्यम लिगली अजुन approved नाही. बाकी साधारण माहिती सभासदांना व्हावी म्हणून सोशल मिडीयाचा वापर आम्ही करतो. आमची प्रसिद्धी ही भावना नसून कामाची माहिती व्हावी हीच इच्छा आहे. आपल्या काही घटना दुरुस्ती बाबत शिफारशी असतील तर आपण त्या E-mail नेही पाठवू शकता. Diese E-Mail-Adresse ist vor Spambots geschützt! Zur Anzeige muss JavaScript eingeschaltet sein! लक्षात घ्या घटना दुरुस्ती अतिशय जरुरीची आहे. आपणा सर्वांची उपस्थिती अत्यावश्यक आहे. काही लोकांना हेतुपुरस्सर ञास देण्यातच आनंद वाटतो. आपण त्यांना काहीच करु शकत नाही.परंतु अशाही लोकांच्या पञाची दखल आम्ही घेतो. आपण सारे सूज्ञ आहात. आपल्या पाठींब्यावरच आतापर्यंत चांगल्या कामांची सुरुवात आम्ही केली आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
अध्यक्ष, संचालक मंडळ व पदाधिकारी

