अ वर्ग व आजीव तसेच सन्माननिय सभासदांना नम्र आवाहन
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि १५ डिसेंबर २०१९ रोजी ठीक सकाळी ११ वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड,कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. २०१८-१८ चा वार्षिक अहवाल सर्व कार्यालयांतून सभासदाना समक्ष देणेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा अहवाल व्हाट्सअप् व इ मेल द्वारेही पाठविण्यात येत आहे. आपला ई मेल व व्हाॅटस् अँप नंबर बदलला असले तर आपल्या जवळच्या कार्यालयास कळवावे,म्हणजे त्वरित अहवाल पाठवता येईल.
सभासदांना अहवाल लवकर मिळावा हा हेतू असून जास्तीत जास्त सभासदांना सभेस उपस्थित राहता यावे हा यामागचा हेतू आहे.
अ.भा.म.चि.महामंडळाच्या सर्व कार्यालयांत ५० वा वार्षिक अहवाल पाहाण्यासाठी उपलब्ध आहे. सभासदांनी आपल्या सूचना व प्रश्न आपण ७ डिसेंबर पूर्वी समक्ष अथवा पोस्ट ,कुरिअर ने संस्थेच्या प्रमुख कार्यालयात पाठवावेत. लेखी सूचना पाठविणारे सभासद सभेला हजर असतील तरच त्यांची सूचना पटलावर घेण्यात येईल.
यासोबत आपल्या अवलोकनार्थ अहवालाची PDF format फाईल जोडत आहोत.
तरी कृपया या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
***********
*मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालक.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*